मुलीचे लग्न झाल्यानंतर शिधा पत्रिकेतून तिचे नाव कमी न करता कुटुंबातील इतर सदस्यांनी अन्न सुरक्षा योजेनचा लाभ घेतल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यातील पिपळगाव हरेश्वर येथे घडला आहे. याबाबत तक्रार आल्यानंतर कुटुंबांतील आठ सदस्यांविरोधात पिंपळगाव पोलिसात शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे. पाचोरा तहसील कार्यालय येथे निलेश नामदेव उभाळे ( रा. भोजे ता. पाचोरा) यांचेतर्फे तक्रार देण्यात आली होती.