निंभोरा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोलवाडे येथील ईश्वर काशिनाथ तायडे यांचे तापी पूर्णा तोल काटे आहे. यातून काटे कार्यालयात अज्ञात चोट्यांनी लोखंडी सेफ्टी दरवाजा तोडून आज प्रवेश केला बॅटरी इन्वर्टर असे एकूण २० हजाराचे साहित्य तेथून लांबवले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.