भंडारा शहरातील विश्रामगृहात भंडारा शहर काँग्रेस कमिटीची बैठक खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घेण्यात आली. भंडारा शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रभाग रचना करण्यात आली. निरिक्षक यांच्यावर जिम्मेदारी देण्यात आली. तसेच नगर परिषद भंडारा सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपने सहभाग नोंदविला.