आज मंगळवार दोन सप्टेंबर रोजी छावणी पोलिसांनी माहिती दिली की, एक सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता फिर्यादी मधुकर सिताराम म्हस्के राहणार पडेगाव छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता फिर्यादी यांचा मुलगा वैभव मस्के यांच्या दुचाकीला आरोपी प्रभाकर शिवाजी शिंदे राहणार वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांनी कारणे धडक देऊन फिर्यादीच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे, याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.