मोर्शी तालुक्यातील बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारे साहित्य व भांडी किट मोर्शीतच वितरित करण्यात यावे अशी मागणी आज दिनांक 22 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मोर्शी तहसील कार्यालयाच्या परिसरातील सेतु संचालक राजेश मानकर यांनी केली आहे. याबाबतीत शासनाने तातडीने निर्णय घेतल्यास संपूर्ण लाभार्थ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील राजेश मानकर यांनी दिला आहे