आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमो जनसुरक्षा विधेयक विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करून महाविकास आघाडी कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे. यामुळे हे विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने आंदोलन करण्यात आले.