कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामे व शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवार,दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली.या बैठकीत जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध पायाभूत सुविधा,रस्ते,सिंचन, आरोग्य,शिक्षण व इतर शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला.इचलकरंजी शहरातील विकासकामांचा वेग वाढविणे,प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे तसेच अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या.