जून महिन्याच्या सुरुवातीपासून ते सप्टेंबर २८ पर्यंतचा सविस्तर अहवाल असा आहे. लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पुरपरिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. या काळात प्रशासनाच्या तत्परतेमुळे एकूण ६२ नागरिकांचा स्थानिक पथकांमार्फत थेट बचाव करण्यात आला, तर जवळपास ११४२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून तात्पुरत्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले.