बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनस्थळी जाऊन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत खासदार सोनवणे यांनी जरांगे पाटील यांना आपला निःसंदिग्ध पाठिंबा जाहीर केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत केंद्र आणि राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत, असा ठाम सूर त्यांनी लावला. खासदार सोनवणे म्हणाले की, "मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी मी सदैव लढा देणार आहे.