मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून एका कारमधून वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.दारूचे 15 बॉक्स व कार सह एकूण 2 लाख 55 हजार मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून ही कारवाई शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आली.