दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने प्राणघातक लोखंडी तलवारी बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने चिंचोली फाटा,शेतकरी ढाब्याच्या पाठीमागे ताब्यात घेतले आहेत.गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेला गोपनीय माहितीनुसार योगेश नवाळे हा बेकायदेशीर रित्या प्रारघातक धारदार लोखंडी तलवार हातात बाळगून चिंचोली फाटा परिसरात फिरत आहे. त्यानुसार सापळा रचून त्याला शेतकरी ढाब्याच्या पाठीमागे त्याला ताब्यात घेण्यात आले.त्याच्या ताब्यातून दोन तलवारी जप्त केल्या आहे.