बुलढाणा शहरातील ट्रेझर ऑफिससमोरील पुतळ्याजवळ निष्काळजीपणे वाहन चालवल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी घडली आहे.विठाबाई गोविंदराव गुजर असे मृतक महिलेचे नाव आहे.याप्रकरणी वैशाली जगन्नाथ गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती 13 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.