आम आदमी पार्टीच्यावतीने महाराष्ट्रातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या सरकारविरोधात आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर "झोपा काढा आंदोलन" आयोजित करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने भंडारा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्य अधिकारी नगरपरिषद भंडारा यांच्या कार्यालयात 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता दरम्यान झोपा काढा आंदोलन करण्यात आले. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टदरम्यान भंडारा शहरातील सरकारी शाळांचे निरीक्षण करून महत्त्वाच्या सुविधांचा अभाव अधोरेखित करत...