अकोला जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी समाजातील एकता व सौहार्द जपण्यासाठी ईद-ए-मिलादची मिरवणूक ५ सप्टेंबरऐवजी ९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकान्वये ९ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासंबंधीची माहिती ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली.