अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड येथे रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता खा. लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडकोट संवर्धन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची आणि इतिहासाची सेवा आहे.