मुलाने आईस मारहाण करून जखमी केल्याची घटना जनुना येथे २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. याबाबत सौ जिजाबाई प्रल्हाद हरमकार वय ६०वर्ष राहणार जनुना यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, मुलगा रविंद्र प्रल्हाद हरमकार हा नेहमी शेतीचा हीस्सा द्या नाही तर मला पैसै द्या असा तगादा लावतो वाद करतो. त्याने घरातील फावडे विकण्यास घेउन जात असताना त्याला फावडे घेउन जाउ नको असे म्हटले असता त्याने शिवीगाळ केली व त्याचे हातातीथ फावड्याने मारुन जख्मी केले.