हाडोळतीत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; २३ किलो चांदी लंपास - अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन सराफा दुकाने फोडून तब्बल २३ किलो चांदी आणि १८ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. शिवाजी चौकाजवळील मेन रोडवरील 'अमित ज्वेलर्स' आणि 'विठ्ठल ज्वेलर्स' या दोन दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य