औसा : राज्यातील बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी कत्तलखान्यासमान ठरत असून शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून सुरू असलेली लूट तात्काळ थांबवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने औसा बाजार समितीला दिला. यासंदर्भात 9 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता संघटनेच्या वतीने बाजार समितीला निवेदन देण्यात आले.