पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे श्री गणेश असावाच्या पार्श्वभुमीवर एक महत्वपूर्ण आढावा बैठक आज दि.30 आगस्ट ला 3 वाजता आयोजित करण्यात आली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांनी भुषविले. विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांच्या संकल्पनेने जिल्हयात एक (सामाजिक सलोखा) नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले असुन त्यात जिल्हयातील प्रतिष्ठीत जबाबदार नागरिकांना समाविष्ठ करण्यात आले.