अंबाजोगाई तालुक्यातील बोरूळ तलावात एक अनोळखी मृतदेह आढळून आलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तलावात तरंगत असलेल्या या मृतदेहाची माहिती समजताच ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की मृत्यूला अंदाजे 15 दिवसांहून अधिक कालावधी झाला असावा. एवढ्या दिवसांपासून पाण्यात असल्यामुळे मृतदेहाची अवस्था पूर्णपणे विघटित झाली आहे. तलावातील माशांनी चेहऱ्यावर कुरतडल्याने मृत व्यक्तीची ओळख पटवणे कठीण झाले