भंडारा जिल्ह्यात आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे लाखनी येथील समर्थ विद्यालय परिसर जलमय झाला. शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे शाळा परिसरासह चक्क वर्ग खोल्यात पाणी साचल्याने शाळेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.