सातारा जिल्ह्यातील उरमोडी, धोम, कण्हेर आणि महू- हातगेघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने याबाबत कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिले.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मदत व पुनर्वसन विभागातर्फे मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी एक वाजता बैठक झाली. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.