आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी गडकरी रंगायतन येथे भेट दिली. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी रंगायतनचे लोकार्पण झाले होते. मात्र हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचे बोर्ड अडगळीत टाकलेले पाहायला मिळाले. त्यावर आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली असून हे दोन्ही बोर्ड दर्शनी भागात लावावे अशी मागणी केली आहे.