वडनेर दुमाला व पिंपळगाव खांब येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तीन बिबटे जेलबंद करण्यात वन विभागाला यश आले असले तरीही जय भवानी रोड भागातील लोणकर मळा येथे पुन्हा बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा माग काढत गस्त घातली असता त्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ संपर्क साधून माहिती दिली.