कोंबड्यांच्या निर्दयी झुंजींवर पैज लावून गावोगावी फोफावलेल्या अवैध जुगार धंद्याला अखेर पोलिसांनी जबर धक्का दिला आहे. अहेरी पोलिसांनी शनिवारी टेकुलगुडा आणि तलवाडा या दोन गावांवर सलग धाड टाकत तब्बल 4 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 19 आरोपींना अटक करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम आंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.