मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे आज दि. 12 सप्टेंबर रोज शुक्रवारला दुपारी 3 वा. पं.स. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लक्ष्मी मुक्ती योजना व पांदन शिवार फेरी योजना अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभागातर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविला जात असून या अभियानांतर्गत स्त्रियांचे हक्क सुरक्षित करणे व शेत जमिनीवरील अतिक्रमित पांदण रस्ते मुक्त करणे याबाबत कार्यशाळेत माहिती देण्यात आली.