दारव्हा शहरातील अनेक नगरांमध्ये अलीकडे माकडांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून, आर्थिक हानीसह जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे माकडांचा त्वरित बंदोबस्त करावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संदीप शिले यांनी आज दिनांक ३ सप्टेंबरला दु. १ वा. वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे.