दरवर्षीप्रमाणे यंदा देखील किसन नगर क्रमांक दोन येथे जनजागृती सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेशाचे विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करून आरती करण्यात आली. यावेळी सर्वांना सुख-शांती समृद्धी लाभो,शेतकऱ्यांचे सर्व दुःख व्हावेत अशी मागणी गणरायाकडे शिंदे यांनी केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सचिव राम रेपाळ यांच्यासह स्थानिक शिवसैनिक आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते .