धुळे शहरात मद्य विक्री दुकाने 5 व 8 सप्टेंबरला तारखेला बंद ठेवा मागणी करत दोन सप्टेंबर मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान एम आय एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निदर्शन केले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री सोनवणे यांना लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आलेले आहे की महंमद पैगंबर जयंतीनिमित्त आणि अनंत चतुर्दशी निमित्ताने तसेच आठ सप्टेंबरला जुलूस निमित्ताने शहरातील सर्व दारू दुकाने बंद ठेवावी. अशी मागणी करत निवेदन देण्यात