पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी खैरी वलमाझरी गट ग्रामपंचायतच्यावतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती.शनिवार दि.6सप्टेंबरला रात्री9वजता पासून गावकऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद देत सार्वजनिक तसेच वैयक्तिक गणेशजींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले.खैरी वलमाझरी गटग्रामपंचायतचे सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे तसेच पोलीस पाटील शंकरजी कापगते यांनी गावकऱ्यांचे उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले आहे