बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज दि ९ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे ,महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटिअर नोंदी लागू केल्यामुळे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही आदिवासींचा दर्जा मिळावा अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. इतिहास पाहता बंजारा समाजाला आदिवासी मानले जावे अशी भूमिका या मागणीसाठी घेतली जात