तासखेडा या गावात भूषण सुरेश बाम्हेंदे वय ३६ हा तरुण राहत होता या तरुणाने दारूच्या नशेत तासखेडा शिवारातील शेत गट क्रमांक ६६ वरील बांधावर जाऊन तेथील भोकरच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय रावेर येथे नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.