हुपरी येथील सिद्धार्थनगरमध्ये घडलेल्या २९ लाखांच्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच हुपरी पोलिसांनी केवळ २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली. पृथ्वीराज परशराम जाधव (१९) व त्याचे वडील परशराम सर्जेराव जाधव (४४, दोघेही रा.तळंदगे फाटा, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) यांना हुपरी पोलिसांनी मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता अटक केली असल्याची माहिती आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता हुपरी पोलिसातून मिळाली.