लातूर-शहरातील गल्ली भागामध्ये सिद्धू शिवार भुजबळ यांनी तू माझ्या घरी का आलास असे म्हणत रामलिंग शिवराज खडके यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण करून उजव्या डोळ्यावर बुक्की मारून घरातील कुकरचा दांडा डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात रामलिंग खडके यांच्या फिर्यादीवरून सिद्धू भुजबळ यांच्या विरोधात गाधी चौक पोलीस ठाण्यात दिनांक 10 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.