पंजाबमधील अमृतसर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे २०० कुटुंबे बाधित झाली आहेत. या पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार इंडियन रेड क्रॉस, जळगाव शाखेने पुढाकार घेतला आहे. मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगावातून जीवनावश्यक वस्तूंचा एक ट्रक अमृतसरकडे रवाना करण्यात आला आहे.