पुणे – स्वारगेट परिसरात बस प्रवासादरम्यान प्रवाशाच्या खिशातून तब्बल ४५ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील ४२ वर्षीय व्यक्ती हिराबाग पीएमटी बस स्टॉप येथून कात्रजकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेत फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. घटनेनंतर फि