कुमठे पाठोपाठ चंचळीतील ग्रामस्थ सौरऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले असून सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी महादेवाच्या डोंगरावर सुरू करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले आणि तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. या संदर्भात माहिती देताना चंचळीतील ग्रामस्थांनी सांगितले की, कोरोना काळात लॉकडाऊन असताना प्रशासनाने बेकायदेशीररित्या महादेवाच्या डोंगराच्या पश्चिमेकडील बाजू महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा कंपनीस सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी दिली आहे.