श्रावण महिन्याच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथील श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने श्री केदारेश्वर मंदिरामध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजता श्रावण मास भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करून रथ पूजन करण्यात आले तसेच मंदिरातील नवीन ध्वजाचे पूजन करून अनावरण करण्यात आले. भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे उपस्थित होते.