नवापूर शहरातील गांधी पुतळा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडण्याचा मध्यरात्री चोरट्यांनी प्रयत्न केला. परंतु नवापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना घटनेची माहिती कळताच त्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले आहे. पोलीस कर्मचारी किशोर वळवी यांच्या धाडसी पराक्रमामुळे मोठी घटना टळली आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने मोठी कामगिरी केली आंतरराज्य चोरट्यांची टोळी अटक करण्यात यश आल आहे.