ओबीसी आणि मराठा समाजात झालेल्या समोरासमोरील संघर्षानंतर आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला बालाघाटावर मराठा समाजाने मोठ्या उत्साहात दुग्धाभिषेक घालून आपला विश्वास व समर्थन व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. घोषणाबाजी, एकोपा आणि भावनेने भारलेले वातावरण यावेळी अनुभवायला मिळाले. आंदोलनाच्या लढ्यात समाज एकजुटीने उभा असल्याचा संदेश या दुग्धाभिषेकातून देण्यात आला.