आज दि २१ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि कन्नड तालुक्यातील दहिगाव येथे झालेल्या ग्रामसभेत सरपंच किशोर सतुके यांच्याविरुद्ध ग्रामस्थांनी आणलेला अविश्वास ठराव ८१ मतांनी मंजूर झाला. अडीच वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून पायउतार व्हावे लागले असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.ग्रामसभेत झालेल्या गुप्त मतदानात एकूण 1,009 ग्रामस्थांनी मतदान केले. यापैकी 438 मते सतुके यांच्या बाजूने तर 519 मते त्यांच्या विरोधात पडली.