वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून एका युवकाने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज 27 ऑगस्टला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.नदीत उडी घेतलेल्या युवकाचे नावं प्रणय गोखरे (23) वर्ष रा.जैन ले आउट वणी असे आहे.प्रणय गोखरे या तरुणाची मोटार सायकल वर्धा नदीच्या पाटाळा पुलावर आढळून आली. महामार्गावर लावण्यात आलेल्या पाटाळा पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, हा तरुण सकाळी 10.00 वाजता पुलावरून नदीत उडी घेतांना दिसून आला.