समृध्दी महामार्गावर चालत्या कंटनेरमधून तब्बल 2 कोटी 43 लाखांच्या वॅक्सीनच्या रॉबरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलने आंतराज्यीय टोळीला पकडून त्यांच्याकडून जवळपास 38 लाखाचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून, संबंधीतांना कारंजा न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती दि. 08 सप्टेंबर रोजी दुपारी पोलिसांच्यावतीने देण्यात आली.