दिग्रस शहरात आज दि. ६ सप्टेंबर रोजी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शेकडो घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातील मुख्य मार्गावरून निघाल्या. मिरवणुकीत महिलांचा, तरुणांचा तसेच चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. लहानग्यांनी नाचत-गात सहभाग नोंदवला. मात्र विसर्जनाच्या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. भक्ती, उत्साह आणि विरह यांच्या संगमाने वातावरण भारावून गेले.