लातूर-मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पातून मांजरा नदीत वेळोवेळी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २८ आणि २९ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात सध्या १५ हजार ७२४ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजरा आणि तिच्या उपनद्यांच्या काठावरील गावांतील नागरिक, शेतकरी व नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आणि विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले.