लातूर -लातूर जिल्ह्यात वारंवार मटका जुगार चालवणाऱ्या आठ आरोपींना जिल्ह्यातून **हद्दपार** करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांनी या आठ जणांवर तडीपाराची कारवाई केली आहे. त्यातील दोन आरोपींना तीन महिन्यांसाठी तर उर्वरित सहा जणांना दोन महिन्यांसाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.