कोंढाळी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवेद्यरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपीचे नाव बंडू फलके असे सांगण्यात आले असून आरोपीकडून दुचाकी व दारू असा 49,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे