सातपूर भागातील बजरंग नगर येथे हद्दपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेऊन सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार राहणार गणेश कॉलनी, श्रमिक नगर, सातपूर याला परिमंडळ दोन उपयुक्त यांच्या आदेशाने दोन वर्षाकरिता नाशिक शहर व ग्रामीण भागातून हद्दपार केलेले असतानाही शहरात वावरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई