वाशिम च्या मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील संतोष रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर रानडुकरांनी मोठा हल्ला चढवला असून, उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांचा हा उपद्रव होत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत.आधी अतिवृष्टी, नंतर हुमनी अळी आणि आता रानडुकरांचा त्रास— या सलग संकटांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. रोकडे यांच्या शेतातील काही भागात उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी