येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी भंडारा शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली. ही बैठक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे उपस्थित होते. या बैठकीत भंडारा शहरातील नागरिकांच्या समस्या, विकासाची कामे, तसेच आगामी निवडणुकी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. सर्वांनी एकजुटीने पक्ष संघटनेच्या कामाला लागा.